द पॉईंट नाऊ ब्युरो : अहमदनगर जिल्ह्यातील नगर जिल्हा सहकारी बँकेच्या ऑडिट विभागात आग लागल्याने सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. शुक्रवारी ही घटना घडली. नुतन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे.
शुक्रवारी सायंकाळी आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी लागलीच अग्निशमन विभागाला संपर्क साधला. अग्निशमन विभागाद्वारे दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. आधी महापालिकेचा अग्निशमन बंब आला होता. मात्र बऱ्याच प्रयत्नानंतर देखील आग आटोक्यात येत नसल्याने, एमआयडीसी च्या अग्निशमन विभागाचा देखील बंब बोलावण्यात आले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली. यात बँकेची सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत असून, याबाबत चौकशी केली जाणार आहे. आग लागल्यानंतर प्रचंड आगीच्या ज्वाला निघू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम