सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने घोषित केला आहे .मंगळवार (दि. ८) पर्यंत नामनिर्देशन अर्ज भरता येणार आहेत, तर १५ तारखेला नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात येईल सदस्यांची फोडाफोड होऊन नये यासाठी सर्व पक्षांनी काळजी घेत आपापल्या गटनेत्यांची निवड करत इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
गेल्या महिन्यामध्ये जिल्ह्यात सुरगाणा पेठ ,कळवण, देवळा ,निफाड व दिंडोरी नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले .त्यानंतर २७ जानेवारीला नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. त्यानंतर सगळ्यांनाच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीचे वेध लागले होते.
अखेर जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला. इच्छुकांना अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज (दि.८) आहे. आजच अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना अपिलासाठी शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी पाचपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर लगेचच वैध नामनिर्देशन अर्ज प्रसिद्ध करण्यात येतील. माघारीसाठी १४ तारखेपर्यंत मुदत असेल, तर १५ तारखेला नगराध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात येईल. या निवडीनंतर लगेचच विशेष सभा घेऊन, उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम