सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : येथील नगरपंचातीच्या विविध विषयसमित्यांच्या सभापती व सदस्यांची तौलानिक संख्याबळानुसार निवड करण्यात आली . निवडणुकीसाठी असलेले पीठासीन अधिकारी तथा देवळ्याचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हि निवड प्रक्रिया राबविण्यात आली .
निवड झालेले सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे – स्थायी समिती सभापती – नगराध्यक्ष भारती आहेर ,सदस्य – जितेंद्र आहेर ,अशोक आहेर ,संजय आहेर ,सुनंदा आहेर ,ऐशवर्या आहेर.

पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती सभापती – जितेंद्र रमण आहेर ,सदस्य – मनोज आहेर ,संतोष शिंदे ,कैलास पवार ,करण आहेर .

सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – अशोक संतोष आहेर ,सदस्य- संजय आहेर ,सुलभा आहेर ,भाग्यश्री पवार ,भूषण गांगुर्डे .

महिला व बालकल्याण समिती सभापती – ऐशवर्या जगन आहेर ,सदस्य -राखी भिलोरे ,शिला आहेर ,रत्ना मेतकर ,अश्विनी चौधरी ,

स्वच्छता व आरोग्य शिक्षण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती -संजय तानाजी आहेर ,सदस्य , जितेंद्र आहेर ,मनोज आहेर ,शिला आहेर ,भूषण गांगुर्डे.

नियोजन व विकास समिती सभापती -सुनंदा आहेर , सदस्य – जितेंद्र आहेर ,भाग्यश्री पवार ,संतोष शिंदे ,अश्विनी चौधरी यांचा समावेश आहे .

या निवड प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी संदीप भोळे यांचे सहकार्य लाभले . या निवडीप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर , बाजार समितीचे माजी सभापती अशोक आहेर ,माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार आदी उपस्थित होते . याप्रसंगी निवड झालेल्या सर्व सभापती व सदस्यांचा सत्कार करण्यात आला .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम