नगरपंचायत निवडणूकीत ओबीसी आरक्षणाला गालबोट ; त्या जागेवरील निवडणूक रद्द

0
43

द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यातील नगरपंचायत निवडणुकीला आरक्षणा मुळे गालबोट लागला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत कोर्टाने निर्णय देतांना इमपीरिकल डाटा नसल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी जागांवरील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. ओबीसी जागा वगळता इतर जागांवर निवडणूक होणार.

भुजबळ म्हणाले की कोर्टाने दिलेला निकाल क्लेश दायक असून आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतोय आम्ही भारत सरकारकडे इमपीरिकल डाटा मागतोय, आम्ही गोळा करायला गेलो तर निवडणुका जवळ आल्या आहेत , आयोग ही नेमला आहे धुळ्याचे वाघ, गवळी कोणी तरी आहेत ते कोर्टात जाऊन प्रश्न लावून धरत आहेत ते बिजेपीचे सेक्रेटरी आहेत.

आजचा निर्णय निवडणूका होऊ घातल्या आहेत त्या होतील मात्र 27 टक्के आरक्षण त्या निवडणूका होणार नाही. आमची कोर्टाला विनंती आहे आम्हाला वेळ द्या , आम्ही वकील दिलेत, मात्र त्यांचे वकील भारी आहेत.

ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचा प्रयत्न केंद्राचा सुरू वकिलांशी चर्चा करून 13 तारखेला काय करता येईल बघू.

राजकीय षडयंत्र 100 टक्के असल्याच वाटतय,फडणवीस म्हणतात मी सपोर्ट करतोय, मात्र त्यांचेच लोक कोर्टात जातात.

बावनकुळे ओबीसीच नुकसान करतात
फडणवीसशी बोलणार,आम्ही चर्चा करू
तुम्ही कोर्टबाजी करणाऱ्यांना का थांबवत नाही
मुंबईत जाऊन सर्वांशी चर्चा करू.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here