नगरपंचायत निवडणुकीत 5 उमेदवारांची माघार ; 11 जागांसाठी 33 उमेदवार मैदानात

0
149

देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज सोमवारी माघारीच्या दिवशी ५ उमेदवारांनी माघार घेतली असून ११ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत .

प्रभाग निहाय उमेदवार आकडेवारी याप्रमाणे ; प्रभाग क्रमांक – १ (३ उमेदवार ) ,प्रभाग क्रमांक २ (३ उमेदवार ) प्रभाग क्रमांक ३(३ उमेदवार ) प्रभाग क्रमांक ५ (३ उमेदवार ) प्रभाग क्रमांक ६ (३ उमेदवार ) प्रभाग क्रमांक ७ (३ उमेदवार ) प्रभाग क्रमांक ९ (४ उमेदवार ) प्रभाग क्रमांक ११(३ उमेदवार ) प्रभाग क्रमांक १२(३ उमेदवार) प्रभाग क्रमांक १५(२ उमेदवार ) प्रभाग क्रमांक १६(३ उमेदवार ) याप्रमाणे ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत .

एकूण ३८ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांनी माघार घेतली असून त्यात तीन अपक्ष, तर भारतीय काँग्रेसच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे . उद्या दि १४ रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, देवळा शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here