नगरपंचायतचा कारभारी कोण ठरणार ? : गुरुवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

0
13

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील नगरपंचायत निवडणूक नुकत्याच पार पडल्या, सर्व्यांचे लक्ष लागून असलेले अध्यक्ष पद आरक्षणाची सोडत गुरुवारी होणार असल्याने तालुक्याचा कारभारी कोण हे ठरणार आहे.

याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत गुरुवार, दि. २७.०२.२०२२ रोजी दुपारी ०४.०० वा.. मा.प्रधान सचिव (नवि-२) महोदयांच्या अध्यक्षतेखाली, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित केली आहे.

सद्यिस्थितीत कोवीड-१९ च्या संक्रमणामुळे विहीत केलेले आयोग्य विषयक निकष विचारात
घेता, सदर सोडतीसाठी संबंधित अधिकारी/ लोकप्रतिनिधोनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याचे सांगितले आहे.

सबब, सदर सोडतीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी आपल्या कार्यालयात दुरदृष्यप्रणाली (व्हिडीओ कॉन्फरनस V.C.) ची व्यवस्था करावी. तसेच, सदर सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील १० लोकप्रतिनिधीना ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थितः राहण्याबाबत कळविण्यात यावे असे उपसचिवांनी सांगितले आहे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here