देवळा प्रतिनिधी : धाराशिव संचलित वसाका कार्यस्थळावर सन २०२१-२२ या गळीत हंगामाला यशस्वी सुरुवात झाली असून या कारखान्यातील शुगर हाउसमध्ये या हंगामात निर्मित पहिल्या ११ पोंत्याचे पुजन आज शनिवार (दि.४) रोजी करण्यात आले.
आमदार डॉ.राहुल आहेर व कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, संचालक आबासाहेब खारे, सुरेश सावंत, संतोष कांबळे, बाळासाहेब बिरारी यांच्या हस्ते पोत्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री.पाटील म्हणाले की, वसाकाच्या आगामी गळीत हंगामासाठी सर्व घटकांनी सहकार्य करत हंगाम यशस्वी करावा असे आवाहन केले.
यावेळी जनरल मॅनेजर पठाण, युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, चिप केमिस्ट् सुर्यवंशी, चिप इंजिनिअर शेलार, आफिस पर्यवेक्षक श्री.शेवाळे, शेतकी अधिकारी शिंदे ,मुख्य लेखाधिकारी कोर युनियनचे सरचिटणीस रवि सावकार, दीपक पवार, राजु बोरसे, सुरक्षा अधिकारी किरण आहीरे, कौतीक दळवी यांच्यासह अनेक कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम