सर्वसामान्यच नेता व ठाण्या वाघ म्हणून ख्याती असलेले दिवंगत लोकनेते धर्मवीर आनंद दिघे. धाक, आदरयुक्त दरारा, समोरच्यांच्या उरात धडकी भरवणारी तिक्ष्ण नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे एकवेम अशी त्यांची ओळख होती. धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. धर्मवीर आनंद दिघे याचं व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते.
आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे.तर प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे.
नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला. जगातला सर्वात श्रीमंत असलेला राजकारणी.. या महाराष्ट्राने पाहिला आहे. तर जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा…” हे डायलॉग ऐकायला येतात. चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश ओकचा लूक आहे. प्रसाद ओकला पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आनंद दिघे यांची आठवण येईल.
आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. येत्या 13 मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम