मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री हार्ट अटॅक आल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंची भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त पसरल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच काही कार्यकर्ते धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे.
नेमकं काय घडलं ?
काल पक्ष कार्यालयात पवार साहेबांकडे असताना धनजय मुंडेंना अचानक भोवळ आली त्यानंतर काही काळ त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांना इथे आणलं तेव्हाही ते अनकॉन्शस होते. एमआरआयनंतर त्यांना शुद्ध आली. त्यांना सध्या कोणतंही पथ्य नाही, सगळं जेवण करू शकतात. त्यांची फॅमिली बरोबर आहे. घाबरण्याचं कारण नाही असंही अजित पवार म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम