द पॉईंट नाऊ ब्युरो : वाळू माफियांची गुंडगिरी पुन्हा एकदा दिसून आली आहे. बीड जिल्ह्यातील खामगाव आणि सावरगाव भागात वाळूमाफियांनी पोलिसांच्या अंगावरच ट्रॅक्टर घातल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खामगाव आणि सावरगाव परिसरात सुरू असलेल्या गोदावरी नदीपात्रातील वाळू उपशाच्या ठिकाणी पोलीस छापा टाकायला गेले होते. मात्र वाळू माफियांची हिम्मत इतकी वाढली की, त्यांनी थेट पोलिसांच्या अंगावरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला.
याप्रकरणी अण्णा साळुंके, सचिन साळुंके आणि पप्पू (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा दिसून आली आहे. दरम्यान, या कारवाईत वाहने आणि वाळूसह एकूण तीन कोटींचा माल जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम