द पॉईंट नाऊ : सरकारने दिलेल्या माहिती नुसार 2020 या सालात 63 हजार मुली व महिला गायब झाल्या असून, यातील काही मुली सापडल्या मात्र अजूनही 23 हजार मुली गायब आहेत. अशी धक्कादायक माहिती सरकारने दिली आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील विधिमंडळात उत्तर देतांना त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. मुली गायब होण्याच्या आकडेवारीत महाराष्ट्रचा चौथा क्रमांक आहे. यात सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक गुन्हे मात्र अजूनही दाखल केले जात नाही. ह्या सर्व आकडेवारीचा विचार केल्यास नक्कीच चिंता वाढवणारी घटना आहे.
देशात मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी सुरू आहे, की काय अशी शंका उपस्थित होत आहे. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात मुलींनी गायब होणं अन त्यांचा शोध न लागणे हे यंत्रणेचे अपयश आहे. एका बाजूला शक्ती सारखे कायदे बनवायचे अन दुसऱ्या बाजूला गायब झालेल्या महिलांचे काय हा प्रश्न उपस्थित राहतोय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम