धक्कादायक ; महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी चिंताजनक, तब्बल २६ हजार रुग्ण

0
60

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या आठवड्यापासून रुग्णांच्या नव्या आकडेवाडीत भयंकर वाढ होत असून. परवा १८ हजारांवर तर काल तब्बल २६ हजारांवर आकडा पोहचल्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात जास्त मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये रुग्णांची वाढ होत आहे.

कालचे रेकॉर्ड –
महाराष्ट्रात दिवसभरात २६ हजार ५५८ नवे रुग्ण आढळले. यापैकी मुंबईतील तब्बल १५ हजार १६६ रुग्ण आहेत. एकूण आकडेवाडी मधील ८ जणांचा मृत्यू व ५ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. दिलासादायक बातमी म्हणजे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९६.५५ % आहे.

दिवसभरातील ओमिक्रोन ची संख्या –
१४४ ओमीक्रोन रुग्णांची नोंद झालेली आहे. यातही मुंबई पुढे आहे, मुंबईतले तब्बल १०० रुग्ण आहेत. बाकी रुग्ण ठाणे, पुणे मनपा येथील ७ तर पिंपरी चिंचवड ६ , कोल्हापूर ५ , उल्लासनगर, भिवंडी, व अमरावती या ठिकाणचे प्रत्येक २ व पनवेल, उस्मानाबादमध्ये प्रत्येकी १ तसेच नागपुरमध्ये ११ रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईमधील काल दिवसभराचा आकडा १५ हजारांपेक्षा जास्त –
काल कोरोनाच्या नव्या रुग्णांनी मुंबईमध्ये थैमान घातला आहे. तब्बल १५ हजारावर आकडा गेला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. रुग्ण कमी करण्यावर सध्या प्रशासनाने लक्ष घातले आहे. लवकरात लवकर संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

पुण्यात दिवसभरात १ हजार ८०५ वर आकडा –
मागच्या २४ तासात पुण्यातील आकडा तब्बल १ हजार ८०५ वर पोहचला आहे. यातील १३१ रुग्णांनी मात केली आहे. रिकव्हरी होत असल्याचे प्रमाण ठीक आहे. मुंबई , पुणे ही २ शहरे आकडेवाडीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत वाढ असली तरी मृत्यूची संख्या कमी आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने दिलासादायक वातावरण आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here