धक्कादायक! पती आणि मुलांसमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार

1
31

द पॉईंट नाऊ ब्युरो : राजस्थान मध्ये पुन्हा महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पीडित महिलेच्या पती आणि मुलांसमोरच बलात्कार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानच्या धौलपूर येथे एका महिलेवर पाच नराधमांनी बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला. या नराधमांनी पीडित महिला कुटुंबासोबत शेतातून परतत असताना त्यांना थांबवून, महिलेच्या पतीस मारहाण केली. आणि त्यांच्या समोरच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजस्थान हा देशात बलात्काराच्या घटनांमध्ये सर्वात पुढे असल्याचे येथील शासनाने स्पष्ट केले होते. राजस्थानमध्ये मागील काही काळापासून एकामागे एक बलात्काराच्या घटनांनी राज्य पूर्णतः हादरले आहे. धौलपूर येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे राजस्थानच्या पोलीस महासंचालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here