द पॉईंट नाऊ ब्युरो : पुण्यामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या लेकराला सार्वजनिक स्वच्छता गृहातील भांड्यात कोंबून ठेवले असल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रोड परिसरात एका जन्मदात्या आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने लहानग्या जीवाला सार्वजनिक शौचालयाच्या भांड्यात कोंबून ठेवले. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच या बाळाचे प्राण वाचवले.
आजवर नवजात अर्भकांना रस्त्याच्या कडेला, कचरा कुंडीत टाकून दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आणि आता पुण्यात ही घटना समोर आली आहे. आई हे जगातील सर्वात महत्वपूर्ण आणि आपल्या बाळासाठी सदैव ढाल बनून उभं राहणारं पात्र समजलं जातं. आणि आई ही नेहमीच आपल्या पोटच्या गोळ्यासाठी धावून येते. मात्र पुण्यात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम