द पॉईंट नाऊ ब्युरो : जालना येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर एका नराधमाने बलात्कार केला या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला याने पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला. अजय गायकवाड असे या नराधमाचे नाव असून तो पैठण येथील राहणारा आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे महिला वर्गाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
शाळेत गेलेली मुलगी लवकर परत आली नसल्याने तिच्या घरच्यांना चिंता लागली होती. त्यासाठी तिची शोधाशोध सुरू झाली. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर या पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतत तिची मेडिकल टेस्ट केली असता, तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, अजय गायकवाड या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम