द पॉईंट नाऊ ब्युरो : डॉक्टर हा देव समाजला जातो. मात्र आजकाल काही डॉक्टर भलतेच प्रताप करत असल्याचे समोर येते.
मुंबईच्या वसई विरार भागात एक डेंटिस्ट कायद्या विरोधातील कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. ही महिला डेंटिस्ट बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे समोर आले. ही महिला डेंटिस्ट तिच्या नवऱ्यासोबत मिळून खाजगी दवाखान्यात गर्भपात केंद्र चालवत होती.
या दोघांवर कारवाई करायला गेले असता, हे दोघेही फरार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या डेंटिस्टचा नवरा हा नुकताच बोगस वैद्यकीय पदवी प्रकरणात सापडला होता.
आता या डेंटिस्टचं हे नव्याने केलेलं बेकायदेशीर कृत्य समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या दोघांचाही शोध घेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम