सटाणा प्रतिनिधी : संत श्री देवमामलेदर यशवंतराव महाराज रथ उत्सव शताब्दी मोहत्सव निमित्त सटाणा शहरात शिव शंभु संघटना नाशिक जिल्हा वतीने यशवंत गौरव सन्मान 2022 चे आयोजन करण्यात आले ह्या सोहळ्यास सुनिल डी. मोरे मा. लोक नियुक्तनगराध्यक्ष, माजी आमदार संजय नाना चव्हाण मराठा विद्या प्रसारक समाज अध्यक्ष तुषार दादा शेवाळे, भालचंद्र आप्पा बागड, अध्यक्ष देवमामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्ट, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्रजी शिंदे व प्रमुख प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रमुख अतिथी पोपटराव बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते, शपिक मुल्ला मा.नगरसेवक, दिपक नंदाळे, भारत काटके आदींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
ह्या सन्मान सोहळ्यास नाशिक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, वैद्यकीय, उद्योजक, वाचनालय अश्या विविध स्थरातून ४१ पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले होते. ह्यात मुख्यता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सटाणा, डॉ. दौलतराव गांगुर्डे (शिक्षण), API देवेंद्र शिंदे, API श्रीकृष्ण पारधी,संतोष तात्या जाधव (पत्रकारिता) जय पगारे, नंदू सानप, मीनाताई मोरे, ज्योतीताई आहिरे, (राजकीय) धनंजय पवार, (सामाजिक) महेश पाटोळे, (सांस्कृतिक), स्वप्निल अहिरे (ग्रामविकास), निसार शेख, योगेश भामरे, ललिता भामरे (ग्रामविकास), रुपालीताई जाधव, स्वप्नील छाजेड, कल्पना येवला, स्मिता येवला, रुपाली कोठावदे, डॉ. कपिल अहिरे, डॉ, विशाल खैरनार, वर्षा खैरनार, सतिश कापडणीस, गणेश सावंत (सामाजिक), भाऊसाहेब खरे (आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी), आदी विविध विभागातून पुरस्कारार्थीना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव शंभु संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जोशी, युवा अध्यक्ष गणेश बागुल, जिल्हा संपर्क प्रमुख स्वप्नील अहिरे, बागलाण तालुकाध्यक्ष आनंद दाणी, मालेगाव तालुकाध्यक्ष दिनेश पगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी परिश्रम घेतले. सन्मान सोहळा सूत्रसंचालन सौ. प्रेरणा सावंत (शिक्षिका) यांनी केले तर सोहळा आभार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितू बापू सूर्यवंशी ह्यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम