देवळ्यात ८१.४५ टक्के मतदान ;शंभरी पार माजी आमदार जनुभाऊ आहेर यांनी केले मतदान

0
32

देवळा प्रतिनिधी ; देवळा नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या चार प्रभागांपैकी तीन प्रभागासाठी आज शांततेत मतदान पार पडले. तर या चार पैकी प्रभाग १३ हा बिनविरोध झाला आहे.

वयाची शंभरी पार केलेले माजी आमदार जनूभाउ आहेर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला (छाया – सोमनाथ जगताप ).

आज सकाळी साडेसात वाजेला मतदानास सुरवात झाल्या नंतर पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत अवघे ७; ८१% टक्केच मतदान झाले होते. यात प्रभाग क्रमांक ४ साठी ६१२ पैकी ६९ तर प्रभाग क्रमांक ८ साठी ६०१ पैकी ५३ व प्रभाग १० साठी ४२६ पैकी अवघ्या ६ मतदारानी मतदान केले होते.

दुपार नंतर मतदान वाढीस सुरवात झाली. दुपारी दिड वाजेपर्यंत ५४% तर साडेतीन वाजेपर्यंत ७३% मतदान झाले. तर सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकुण १६३९ पैकी १३३५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात प्रभाग क्रमांक ४ साठी ६१२ पैकी ४९५, प्रभाग क्रमांक ८ साठी ६०१ पैकी ४९३, तर प्रभाग क्रमांक १० साठी ४२६ पैकी ३४७ मतदारांनी मतदान केले.

यावेळी वयाची शंभरी पार केलेल्या माजी आमदार जनूभाऊ आहेर यांनी देखिल आपला मतदानाचा हक्क बजावला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रस्थानी मालेगांव ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here