देवळ्याच्या सौरभ गुंजाळची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
26

देवळा प्रतिनिधी : 66 वी ज्युनिअर नॅशनल बॉल बॅडमिंटन स्पर्धेत नाशिक ग्रामीणचा बॉल बॅडमिंटन संघटनेचा खेळाडू व येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचा विद्यार्थी चि . सौरभ गुंजाळ याची जि . दिंडीगुल (तामिळनाडू) दि.24 ते 28 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड झाली.

गुंजाळ याच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष संजय उर्फ संभाजी आहेर , प्राचार्य हितेंद्र आहेर, प्रा. प्रमोद ठाकरे , संघटननेचे सचिव तुषार देवरे ,संघटनेचे पदाधिकारी ,सर्व मार्गदर्शक ,आजी-माजी खेळाडूंनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here