द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कसमादे परिसरात अतिशय दुर्दैवी अपघात घडला असून सटाणा – देवळा रस्त्यावर तुर्की हुडीजवळ सटाणा शहराकडून देवळ्याच्या दिशेने फरशी घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन व समोरुन येणाऱ्या मोटरसायकलची धडक झाली आहे.
या अपघातात मोटर सायकलवर चालक संतोष गांगुर्डे व आशा गांगुर्डे या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे गांगुर्डे परिवारावर शोक कळा पसरली आहे.
अपघात टाळण्याच्या प्रयत्न करत असतांना पिकअप वाहन उलटल्यामुळे तीन जन गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.
अपघात ग्रस्त मयत मुळ चांदवड तालुक्यातील असून ते सध्यस्थितीत देवळा तालुक्यातील वाजगांव गावात राहात होते. सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, पो.नि. सुभाष अनमूलवार यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम