देवळा प्रतिनिधी : उमराणे येथिल स्व निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या चार उमेदवारांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याने देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने या बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला .
उपजिल्हा प्रमुख देवानंद यशवंत वाघ आदींसह दिपक आनंदा निकम, दादाजी भिका खैरणार ,नामदेव खैरणार यांची उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याने सत्कार करण्यात आला. यावेळी देवळा उप शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, देवा चव्हाण ,शिवसेना उप तालुका संघटक भाऊसाहेब चव्हाण ,नाजिम तांबोळी, सतिष आहेर ,भाऊसाहेब आहेर आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम