देवळा शहर व तालुक्यात कडकडीत बंद

0
46

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; उत्तरप्रदेशात लखीनपूर मध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी( दि ११) रोजी अत्यावश्यक सेवा वगळता देवळा शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला . उपस्थित पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला .

लखीनपूर घटनेच्या निषेधार्थ देवळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात येऊन काळे झेंडे दाखवतांना महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते (छाया – सोमनाथ जगताप )

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने नागरिकांना बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते . याला देवळा शहर व तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

देवळा पाच कंदील परिसरात बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर ,शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज आहेर , तालुका प्रमुख सुनील पवार ,राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष दिलीप पाटील, बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, संतोष शिंदे , सचिन सूर्यवंशी, सतीश आहेर ,विश्वनाथ गुंजाळ , मनोज गुजरे ,मनोज आहेर,दिलीप आहेर ,कृष्णा आहिरे, सुनील आहेर, महेंद्र आहेर ,आबा खैरणार ,विशाल आहेर, मयूर सोनवणे ,देवा चव्हाण , नाजीम तांबोळी ,विठ्ठल गुजरे , सतीश कोठावदे , साहेबराव आहेर, समाधान शिंदे , सतीश आहेर, भिला सोनवणे ,भाऊसाहेब वाघ, दत्तू आहेर , दादाजी आहेर ,बाळासाहेब मगर,राजेश आहेर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काळे झेंडे दाखवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here