देवळा प्रतिनिधी : येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .आंबेडकरांच्या १३१ व्या जयंती दिनानिमित्त कळवण तालुका दलीत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नगराध्यक्षा भारती आहेर, उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर , गटनेते संभाजी आहेर, नगरसेवक मनोज आहेर ,देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र आहेर, सरचिटणीस गंगाधर शिरसाट, अशोक आहेर , योगेश आहेर ,दिलीप आहेर ,दिलीप मेतकर , नानु आहेर , दिलीप पवार, हेमलता .संदांनशिव,ताईबाई वाघ, नगरसेवक कैलास पवार , कमिटी आध्यक्ष विक्की पवार, दलीत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष भा.ता.अहीरे, संचालक सुधाकर पवार, केशव पवार,आरपीआयचे शांताराम पवार,सतिश पवार, सौरभ पवार, रमेश पवार, गांगुर्डे, जगताप ,उपनगराध्यक्ष अतूल पवार, हर्षद भामरे ,सुराणा पतसंस्थेचे अशोक सुराणा, ,पोपट सुराणा ,बोरासर ,भूषण गांगुर्डे आदींसह नगरसेवक ,सर्वपक्षीय पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
याप्रसंगी कळवण तालुका दलीत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पीकाकासाहेब सोनवणे यांनी प्रास्ताविक व आभार मानले . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीरांच्या जीवनावर आपल्या भाषणातून त्यांनी प्रकाश टाकला . आमदार डॉ राहुल आहेर यांच्या निधीतून पुतळ्याच्या आजूबाजूला शुशोभिकरण करण्यात आले असून लवकरच पुतळा परिसरात गट्टू बसवून देणार आहेत . त्याबरोबरच पाठीमागून जी रीकामी जागा आहे तेथे बौद्ध विहार व संविधान भवन बांधून दिल्यास हॉलचा प्रश्न मिटेल . यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पिकाका सोनवणे यांनी सांगितले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम