देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यात तिसऱ्या लाटेत कोरोनाने पुन्हा डोके वरती काढले असून, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी (दि. १४ ) रोजी २१ कोरोना रूग्ण आढळून आले असून, तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचे अर्धशतक ओलांडले आहे.
गुरुवारी (दिनांक १३) रोजी देखील एकाच दिवशी १० रुग्ण तालुक्यात आढळून आले होते. त्या नंतर आज प्राप्त अहवाल नुसार २१ रुग्ण म्हणजे तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. तालुक्यात आज रोजी एकूण ५३ रुग्ण कोरोना बाधित आहेत. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी, हा विषाणू वेगाने पसरत असल्याने तालुका आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आज आढळून आलेले गावनिहाय रुग्ण पुढील प्रमाणे
देवळा ७, गुंजाळनगर १, माळवाडी ४, वाखारी २, लोहणेर ३, दहिवड २, डोंगरगाव १, खामखेडा (देवळा)१
तालुक्यातील जनतेने घाबरून न जाता काळजी घ्यावी. करोनाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीसोबतच स्वतःचे लसीकरण करून घ्यावे – डॉ. सुधीर पाटील, देवळा तालुका आरोग्यधिकारी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम