देवळा राष्ट्रवादीत ‘नवसंजीवनी’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न

0
133

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा नागरपंचायतीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष आखाड्यात उतरण्यासाठी दंड थोपटत आहेत. मात्र भाजपाशी सामना होतांना थेट जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना अंगावर घेण्यासाठी आज राष्ट्रवादीची प्राथमिक बैठक संपन्न झाली. यामुळे तालुका राष्ट्रवादीला नवसंजीवनी प्राप्त होऊन कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले आहे.

देवळा नगरपंचायतीची निवडणूक घोषित झाल्यापासून नेते मंडळी निवडणुकीची रणनीती आखताना दिसत आहे. याच धर्तीवर आज देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरेल तसेच महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मंडळींशी लवकरच बैठक घेऊन जागा वाटप करून प्रभागात वर्चस्व असणाऱ्या व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम असणारया उमेदवाराचा महाविकास आघाडी कडून उमेदवारी देण्यात येईल अशी एकमताने चर्चा झालेली आहे. लवकरच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांची एकत्रित बैठक होऊन पुढील रणनीती जाहीर करण्यात येईल असे यानिमित्त स्पष्ट करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश आबा आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल (गोटु आबा) आहेर, शहराध्यक्ष दिलीप आहेर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here