देवळा प्रतिनिधी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रविवारी( दि ९) रोजी देवळा येथे आठवडे बाजारचेऔचित्य साधून आरोग्य विभागाच्या पथकाने विना मास्क धारकांचे कोरोना स्वॅब अहवाल घेण्यात आले . कोरोना महामारी आजाराचा पुन्हा उद्रेक दिसून येत असल्याने प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे .
नागरिक घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येत असून, रविवारी देवळा येथे आठवडे बाजाराचे औचित्य साधून याठिकाणी बाजारासाठी येणाऱ्या तसेच विना मास्क धारकांचा आरोग्य विभागाच्या पथकाने स्वब मोहीम राबवली . आज देवळा येथे बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी दिसून आली होती .
मात्र ,प्रशासनाने लादून दिलेल्या नियमांची नागरिकांनी पायमल्ली केली आहे. बहुतांश नागरिक विना मास्क दिसून आले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे . यावेळी वैद्यकीयअधिकारी डॉ. सायली बुवा ,आरोग्य सहायक सोनजे ,प्रयोग शाळा तंत्रज्ञ जाधव ,तालुका समन्वयक अमित आहेर ,आरोग्य सेवक प्रशात कापडणीस, संगीता गायकवाड आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम