
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवळा शाखेतर्फे शुक्रवार (दि.१५) रोजी दसरा सणाचे औचित्य साधत शस्रपूजन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतप्रचारमंडळ सदस्य रमाकांत मंत्री यांनी संघाचा प्रवास, संघाचे ध्येय, संघशक्ती याबाबत विवेचन केले.

आदर्श समाजनिर्मितीसाठी संघ दिशादर्शक काम करत असून स्वयंसेवकांनी त्यासाठी कायम स्वयंसिद्ध रहावे असे आवाहन केले. यावेळी सुभाषित, अमृतवचन, पद्य सादर करत स्वयंसेवकांनी शस्त्रपूजन केले. पी.के.आहेर यांनी वक्तापरिचय केला. यावेळी मालेगाव जिल्हा सहकार्यवाह बाबासाहेब गांगुर्डे, जिल्हा प्रचारप्रमुख बापू शिंदे, जिल्हा ग्रामविकास प्रमुख पुंडलिक आहेर, देवळा तालुका कार्यवाह अशोक मोरे, सहकार्यवाह काशिनाथ सोनवणे यांच्यासह तालुक्यातील स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते. कोरोनामुळे यावर्षीही संचलन काढता आले नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम