
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महानिर्मिती/महापारेषन/महावितरण कंपणीच्या प्रशासनाचा वर्कर्स फेडरेशनच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार आज ( दि.16) रोजी कळवण विभागातील देवळा उपविभागीय कार्यालय कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावुन निषेध केला व जोरदार निदर्शने करण्यात आली .

यात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे १ ) तिन्ही कंपन्यात एकसमान बदली धोरण असावे २ ) निश्चित केलेल्या बदली धोरणाची अंमलबजावणी व्हावी
३ ) रजा रोखीकरणाचे पैसे तात्काळ अदा करावे . ४ ) पगारवाढ फरकाचा तिसरा हप्ता तात्काळ द्यावा ५ ) ० ते ३० युनिट वापर चेक रिडींग आणण्याची जबाबदारी संबंधित रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर टाकावी
६ ) रू . ५००० च्या वरील वीज बिल थकबाकीची वसुली चर्चेत ठरल्याप्रमाणे जबाबदारी निश्चित करणारे परिपत्रक काढावे
७ ) मुख्य कार्यालय ते फिल्ड वरील तांत्रिक ,मासं व लेखा प्रवर्गातील पदोन्नतीचे सर्व पॅनल तात्काळ घ्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे .
या प्रसंगी देवरे(अ.इंजिनिअर देवळा). खाडे (अ.इंजिनिअर देवळा ), विक्रांत आहेर( सर्कल सचिव मालेगाव), गुलाब आहेर(संचालक नाशिक पतसंस्था), संदिप आहेर(उपाध्यक्ष कळवण विभाग) स्वाती शिंदे , पुनम वारे, समाधान सोळुंके, बाळासाहेब मोहिते, राजपाल शिंदे, बापू गांगुर्डे, चेतन धामणे, मोहन जाधव, अनिल धात्रक, राहुल आहिरे आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम