सोमनाथ जगताप
देवळा : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण रुग्णालय , देवळा यांच्या संयुक्त विद्यामानाने देवळा येथे गुरुवार दि २१ रोजी भव्य आयुष्यमान आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश कांबळे यांनी दिली .
या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन ना . डॉ . भारती पवार , आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार असून ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ .. राहुल आहेर , प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष , भाजप केदा आहेर , नगराध्यक्षा भारती आहेर , उपसंचालक डॉ . रघुनाथ भोये , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . अशोक थोरात ,जिल्हा आरोग्य अधिकारी ,डॉ . कपिल आहेर,निवासी वैधकीय अधिकारी डॉ . शरद पाटील उपस्थित राहणार आहेत .
या आरोग्य मेळाव्या प्रसंगी उपस्थितांना युनिक हेल्थ आयडी कार्ड दिले जाणार आहे . तसेच सर्व रोग तपासणी ( विशेष तज्ञांमार्फत ) हृदयरोग , मधुमेह , रक्तदाब , यकृत व फुफुसांचे आजार , गरोदर माता व स्त्री रोग , बालरोग तपासणी , मोतीबिंदू तपासणी , कान – नाक – घसा तपासणी , अस्थिरोग , क्षयरोग , दंतरोग चिकित्सा व दुर्धर आजार , मोफत रक्त , लघवी , क्ष – किरण , इ.सी.जी. , गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया , किशोर वयीन मुला मुलीं साठी , कुमार वयीन बालकांच्या समस्यांविषयी सल्ला व मार्गदर्शन , मरणोत्तर नेत्रदान संदर्भात संमतीपत्र भरून देण्याची सुविधा , राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत संदर्भित बालकांचे गरजेनुसार उपचार व मार्गदर्शन या प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातील .
तरी तालुकयातील सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन देवळा ग्रामीण रूग्नालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . गणेश कांबळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सुधीर पाटील , गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम