देवळा प्रतिनिधी : देवळा – नाशिक राज्यमार्गावर सुरू झालेल्या रिलायन्स जिओला वाहनधारकांकडून मायलेज मिळत असल्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देवळा नाशिक राज्यमार्गावर छोट्या मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. वाहनधारकांची पेट्रोल व डिझेलसाठी रिलायन्सच्या जिओ पंपाची मागणी लक्षात घेऊन या मार्गावर नुकताच रिलायन्स जिओ कंपनीच्या वतीने पंप सुरू करण्यात आला आहे . वाहनधारकांसाठी सर्व सोईनयुक्त सुरू केलेल्या या पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनांची संख्या वाढत आहे. याचे कारण म्हणजे वाहनांना मिळणारे उत्तम मायलेज .यामुळेच वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून , वाहन धारकांची वाढती मागणी लक्षात घेऊन याठिकाणी लवकरच सीएनजीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संचाकल राजीव पगार यांनी दिली .
इतर कंपनीच्या पेट्रोल पेक्षा रिलायन्सच्या पेट्रोल मुळे आमच्या वाहनाचे मायलेज वाढले आहे . दिवसेंदिवस वाढत असलेल्या व गगनाला भिडलेल्या पेट्रोल डिझेलच्या भाव वाढीमुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत . जास्त मायलेज मिळत असल्याने आम्ही रिलायन्स जिओचे इंधन पसंत केले आहे .
बाबा पवार ,वाहन धारक ,भऊर ता देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम