देवळा येथील कु मानसी बेन महावीर लुंकड ही घेणार दीक्षा

0
38

देवळा प्रतिनिधी : मालेगांव येथे ( २४) जानेवारीला देवळा येथील कु मानसी बेन महावीर लुंकड ही दीक्षा घेणार असून, यानिमित्त येथे आज बुधवारी( दि १२)रोजी तिचा जैन श्रावक संघ तसेच देवळा शहर वासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला . देवळा येथील महावीर लुंकड यांची कन्या कु मानसी बेन लुंकड हिचा येत्या २४ जानेवारी रोजी मालेगांव येथे प पु १००८ उत्तमचंदजी म सा यांच्या मुखाने दीक्षा समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने देवळा येथील जैन श्रावक संघ व शहरातील नागरिकांनी कु मानसीचा मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला .

यावेळी बहुतांश महिलांनी तिचे औक्षण केले . याप्रसंगी वीर वीर पिता महाविर लुंकड ,आई अनिता लुंकड तसेच माजी संघपती जसराज सुराणा यांचा जैन समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला .यावेळी माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, शिवसंग्रामचे उदय आहेर आदी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघपती राजेंद्र लुंकड ,साचीन सुराणा,अभय संकलेचा , अशोक सुराणा,दीपक संकलेचा ,राजू सोनी ,ईश्वर सुराणा,अमित बोरा ,सुनील बुरड यांनी विशेष परिश्रम घेतले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here