
द पॉईंट नाऊ ; देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बुधवार दिनांक 24 रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे समन्वयक प्रा.तुषार वाघ यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, एम जे एम महाविद्यालय करंजाळी ता.पेठ यांनी कल्पनारम्य आणि वस्तुस्थिती या विषयावर उत्कृष्ट व्याख्यान दिले व त्याचबरोबर सरांनी कल्पनाशक्ती मुळे लागलेले शोध यावर अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला व विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारांना चालना देण्याचे काम केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्राचार्य डॉ.ए बी पवार, डॉ.व्ही एम जोशी व डॉ.डि के आहेर आदि प्राध्यापक वर्ग व सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्रशासकीय विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रमाचे आभार प्रा.महेश वळवी यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम