द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील क.रा.आहेर कनिष्ठ महाविद्यालयात बुधवार (दि. २१) रोजी आरोग्य विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जंतविरोधी अभियानाअंतर्गत विध्यार्थ्यांना अल्बेंडाझोल (Albendazol) गोळ्यांचे वाटप करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली .
सुरुवातीला प्रत्येक वर्गात या गोळ्यांचे महत्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर रासेयोजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना गोळ्या वाटल्या. उपस्थित विद्यार्थ्यांनी या गोळ्या घेऊन अभियानाला प्रतिसाद दिला .
यावेळी उपप्राचार्य बी.के.रौंदळ, कार्यक्रम अधिकारी अशोक गुजरे,आरोग्य विभाग प्रमुख एन.पी.चंद्रात्रे, एस.एम.आहिरे, आर.एन.शिरसाठ, एस.एन.निकम, यु.आर.वाघ,आर.पी चौधरी,श्रीमती एस.ए.गवळी आदींसह स्वयंसेवक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम