देवळा महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

0
44

देवळा प्रतिनिधी :   कोरोना महामारीच्या परिस्थितीत राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असल्याने ३० डिसेंबर रोजी देवळा महाविद्यालयाचे संस्थापक कै. रामराव पुंजाजी आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, माजी विद्यार्थी संघ व रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये १०६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हिल हॉस्पिटल नासिक व डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक येथील दोन्ही रक्तपेढ्यांना रक्त संकलित करून देण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, संस्थेचे सचिव गंगाधर मामा शिरसाट, उपप्राचार्य डॉ. मालती आहेर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे देवळा तालुक्याचे संचालक डॉ. व्ही. एम. निकम, राष्ट्रीय सेवा योजना नाशिक जिल्हा समन्वयक व कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. के. आहेर, तहसीलदार मा. विजय सूर्यवंशी, रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊनचे अध्यक्ष मा. सुनील देवरे, सचिव खंडू मोरे, वृक्षमित्र सुनील आहेर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सतीश ठाकरे, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयमाला चंद्रात्रे प्रा. राकेश घोडे, प्रा. बादल लाड महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here