देवळा प्रतिनिधी : कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ह्यावर्षीचा साहीत्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त बालसाहीत्यिक संजय वाघ यांना सावित्रिबाई फुले जयंतीचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते. बालसाहित्यिक संजय वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जयवंत भदाणे यांनी केले. प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी संजय वाघ यांना सन्मानित केले. प्रा.एकनाथ पगार यांनी साहीत्य अकादमीच्या पुरस्काराचे महत्व विशद करून नासिक जिल्ह्यात प्रथमच बाल साहीत्यिकाला हा सन्मान प्राप्त झाल्याची माहीती दिली.
संजय वाघ यांनी जोकर बनला किंगमेकर ह्या पुस्तकाची जन्मकथा सांगून हया कथेतील नायकाप्रमाणे स्वतःपुरता विचार न करता प्रतिकुल परीस्थितीवर मात करून समाजासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
यावेळी विधार्थीनींनी काव्यवाचन केले.जोकर बनला किंगमेकर ह्या पुस्तकाच्या प्रती विद्यार्थीनीना भेट देण्यात आल्या. कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम