देवळा प्रतिनिधी ; देवळा महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करियर कट्टा’ फलकाचे अनावरण प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयीन तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने हे माहितीचे दालन उभे करण्याचे कार्य करियर कट्ट्याच्या माध्यमातून केले जात आहे. या उपक्रमा अंतर्गत संविधान पारायण, वृत्तपत्र वाचन, उद्योजक आपल्या भेटीला, सायबर सिक्यूरिटी, इ- फाइलिंग यासारखे उपक्रम राबविले जाणार आहे. या सर्व उपक्रमांचा जास्तीत जास्त महाविद्यालयीन तरुणांनी लाभ घ्यावा असे अवाहन प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी केले.
समन्वयक प्रा. अमित बोरसे यांनी विद्यार्थ्याना उपक्रमा बद्दलची माहिती दिली. १ जानेवारी २०२२ पासुन ते डिसेंबर २०२२ पर्यंत या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्याना घेता येईल त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली नाव नोदणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले . फलकाच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी प्रा. चंद्रकांत दाणी, क्रिडासंचालक पि.एन. ठाकरे, प्रा.यशवंत खैरनार, प्रा. स्वप्निल गरुड आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम