
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यांना बेस्ट कॅडेट अवॉर्ड मिळाल्याबद्दल सर्व स्तरावर त्याचे अभिनंदन होत आहे. बेस्ट कॅडेट अवॉर्ड मुंबई ग्रुप लेव्हल महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना मिळाले.

विद्यार्थ्यांना बेस्ट कॅडेट अवॉर्डने सन्मानित करतांना प्राचार्य हितेंद्र आहेर समवेत उपप्राचार्या डॉ मालती आहेर आदी (छाया -सोमनाथ जगताप )
यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये बेस्ट कॅडेट प्रथम एस.जी.टी थोरात ऋतिक लक्ष्मण य दृतिय क्रमांक कॅडेट गुंजाळ सुदर्शन दत्तात्रेय व विद्यार्थीनींमध्ये प्रथम क्रमांक जे यु ओ. आहेर अंजली सुनील विद्यार्थ्यांना मिळाला ७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी नाशिक कमांडिंग ऑफिसर कर्नल ए.के सिंग यांच्या हस्ते त्याला प्रथम क्रमांक आलेल्यांना ४५०० चा धनादेश व दृतिय क्रमांक आलेल्यांना ३५०० चा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रशासकीय अधिकारी. कर्नल राकेश कुमार व राष्ट्रीय छात्र सेनेच्या अधिकारी लेफ्टनंट बादल लाड हे यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर, उपप्राचार्या प्रोफेसर डॉ. मालती आहेर व प्रा. विजयकुमार जोशी व महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम