देवळा महाविद्यालयाचा ‘बांधिलकी’ विभागीय स्तरावर प्रथम

0
40
देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या 'बांधिलकी' या वार्षिक नियतकालिकाचा प्रथम क्रमांकचे सन्मानचिन्ह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते स्वीकारताना प्राचार्य हितेंद्र आहेर व इतर मान्यवर.

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या ‘बांधिलकी’ २०१९-२० च्या पर्यावरण विशेषांकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून विभागीय स्तरावरील प्रथम पारितोषिक मिळाले.

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या ‘बांधिलकी’ या वार्षिक नियतकालिकाचा प्रथम क्रमांकचे सन्मानचिन्ह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते स्वीकारताना प्राचार्य हितेंद्र आहेर व इतर मान्यवर.

याप्रसंगी कुलगुरुंनी विद्यार्थांच्या पर्यावरण लेखनाबद्दल व असा वेगळ्या धाटणीचा उपक्रम राबविल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले व युवकांच्या पर्यावरणविषयक वाड्मयीन सर्जनशीलतेसाठी महाविद्यालयीन नियतकालिकांचे महत्व मोठे असल्याचे प्रतिपादन केले.

विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या ‘बांधिलकी’ नियतकालिकाने प्रथम पुरस्कार पटकावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर व अधीक्षक दिनेश वाघमारे यांनी स्वीकारले. यापूर्वीही या महाविद्यालयाच्या बांधिलकी ने मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची व पुणे विद्यापीठाची पारितोषिके पटकावली आहेत.

या पर्यावरण विशेषांकात पर्यावरण संरक्षण, रासायनिक खतांचा धोका, प्रदूषण, निसर्गरम्य स्थळे, औषधी वनस्पती अशा अनेक विषयांवर लेखनाचा चांगला प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. पर्यावरणविषयक जाणिवांचे विकसन करणे हा यातील प्रमुख उद्देश होता. या लेखनामुळे विद्यार्थी लिहिते करण्याचा प्रयत्न सफल झाला आहे. अंकाचे संपादक प्रा.रवींद्र पगार, सहसंपादक उपप्राचार्य बी.के.रौदळ, प्रा.एन.वाय.पाटील, प्रा.डॉ.जयमाला चंद्रात्रे यांच्या संपादन समितीने उत्कृष्ट अंकाची परंपरा कायम ठेवली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here