देवळा : तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी वाळू माफियांची पाठराखण करत असून त्यांना सोडून सामान्य नागरिक, व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर यांच्या बांधकामावर दंडात्मक कारवाई करत आहेत. याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी लोहोणेर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच विजया मेतकर यांनी उपमख्यमंत्री अजित पवार व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
२३ मे पासून महसूल यंत्रणे मार्फत लोहोणेर गावात व्यापारी, शेतकरी, शेतमजूर व व्यावसायिक यांच्या घरांचे दुकानांचे बांधकाम चालू असतांना सदर ठिकाणी जाऊन तहसीलदार, नायब तहसीलदार देवळा सह तलाठी यांच्या कडून लोहोणेर गावातील प्लॉट व दुकानांवर तसेच सात बारा यांच्यावर वाळूचा दंडात्मक बोजा चढविण्यात येत आहे.
महसूल यंत्रणा मार्फत २२ मे रोजी गिरणा नदी पात्रात चारी मारण्याची कार्यवाही केल्यानंतर वाळू माफियांना वाचविण्यासाठी ही दंडात्मक कार्यवाही सर्व सामान्य नागरिकांवर केली जात आहे. गेल्या महिन्या भरापासून गिरणा नदी पात्रात संपूर्ण देवळा तालुक्यातील ३०० ते ४०० ट्रॅक्टर रात्री बेसुमार वाळू उपसा करतात. मात्र महसूल यंत्रणा याकडे पूर्णपणे डोळे झाक करत वाळू माफियांना पाठीशी घालते कुठल्याही प्रकारची दंडात्मक अथवा गुन्हा दाखल झाल्याची कार्यवाही आजपावेतो झालेली नाही. गिरणा नदी पात्रात रात्रीच्या वेळी यात्रा भरलेली दिसते महसूल खात्याचे अधिकारी तथा गाव तलाठी कार्यवाहीला येत नाही उलट ग्रामस्थ बोलायला गेले असता त्यांना दमदाटी व आरेरावी ची भाषा केली जाते त्यामुळे कोणतेही ग्रामस्थ बोलण्यासाठी पुढे येत नाही. दि. २३ मे रोजी तहसिलदार, नायब तहसीलदार व तलाठी यांनी लोहोणेर गावात अजबच कार्यवाही करण्यास सुरुवात केली. वाळू उपसा करणाऱ्यांना सोडून गिरणा नदीतील खड्ड्यांचा पंचनामा न करता वाळू माफियांना पाठीशी ठेवत त्यांना वाळूचे ट्रक्टर बंद ठेवण्याचे सांगून नदीच्या दुतर्फा चाऱ्या मारून सर्व सामान्य नागरीक व शेतकरी यांच्या बांधकामावर असलेल्या वाळूचे पंचनामे करून त्यांच्यावर दंडात्मक बोजा चढविला जात आहे. यामुळे महसूल प्रशासनाकडून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. याबाबत ग्रामपंचायत लोहोणेर यांच्या मार्फत तातडीने सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी तात्काळ ही कार्यवाही रोखण्याचे महसूल विभागाला विनंती केली. मात्र महसूल विभाग त्यांच्या मतावर ठाम दिसते यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
देवळा येथील नायब तहसीलदार विजय बनसोड हे देवळा शहर व परिसरातील वाळू माफियांचे हजारो ब्रास वाळूच्या साठ्यांचा पंचनामा न करता लोहोणेर गावातील नागरिकांचे बांधकामाचे पंचनामे करत आहेत. सदर ग्रामस्थांच्या कामावरील दंडात्मक बोजाची कार्यवाही थांबवून गिरणा नदी पात्रातील खड्ड्यांचे पंचनामे आपल्या स्थारावरून करावे सदर महसूल यंत्रणेचे देखील खोलवर चौकशी करून वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांची शासनामार्फत चौकशी करून प्रत्यक्ष गिरणा नदीची पाहणी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रभारी सरपंच विजया मेतकर यांनी केली आहे.
लोहोणेर ग्रामपंचायत सरपंच यांनी जे आरोप केले आहेत ते सर्व चुकीचे आहेत. येथील गौण खनिज संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही कारवाईसाठी गेलो असता वाळू चोरट्यांनी अवैधरित्या वाळूसाठा केला होता. त्यावर कारवाई केल्यानंतर गावात ठीक ठिकाणी बांधकाम स्थळावर मोठ्या प्रमाणावर वाळूचे साठे आढळून आले. त्या बाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारची रॉयल्टी भरली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली आहेत. तसेच रोज शेकडो ट्रॅक्टर वाळू चोरी होते याबाबत ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली असलेल्या ग्राम दक्षता समितीने महसूल विभागास आजपर्यंत का कळवले नाही ? याबाबतही आम्ही पत्रव्यवहार केला आहे.
विजय सूर्यवंशी : तहसीलदार, देवळा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Devla gav ,tasech satana gavat honar valucha dhanda yamdhe satana v deola mahsul adhikari partner ahet , hapte ghetat srv adhikari , pagar kmi padto ya bhurtynna