
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या येथील दि. देवळा मर्चटस् को ऑप बँकेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २४ )रोजी सकाळी १० वाजता बँकेच्या सभागृहात चेअरमन जयप्रकाश कोठावदे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

देमको बँकेच्या माध्यमातुन सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविणेसोबतच देमको चॅरीटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी चेअरमन जयप्रकाश कोठावदे यांनी केली.
व्यासपिठावर व्हा. चेअरमन राजेंद्र वडणेरे , अनिल धामणे, केदारनाथ मेतकर, डॉ .प्रशांत निकम, राजेंद्र सुर्यवंशी, किसन मोरे, मनीषा शिनकर, व्यवस्थापक गणेश ततार व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत सभासदांनी एकमुखी व एकमताने सभेतील सर्व विषयांना मंजुरी दिली. बँकेमार्फत सोनेतारण कर्ज, वाहन तारण कर्ज ,व्यावसायिक कर्ज,ओ डी कर्ज,लॉकर सुविधा ,सभासद मृत्यूनंजय निधी ,अपघात विमा आदी सुविधा पुरविल्या जात असून आगामी काळात ग्राहक व सभासदांच्या हितासाठी आकर्षक व्याजदर योजना सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन जयप्रकाश कोठावदे यांच्या निवडीची सुचना संचालक डॉ प्रशांत निकम यांनी तर अनुमोदन व्हा चेअरमन राजेंद्र वडणेरे यांनी दिले. दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजनानंतर मागील सभेचे इतिवृत्तवाचन व्यवस्थापक गणेश ततार यांनी केले. यावेळी गत वार्षिक सर्वसाधारण सभे प्रसंगी सभासदांनी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी संचालक मंडळाने केल्याचे वडणेरे यांनी नमुद केले.
यानंतर विषय पत्रिकेतील विषयनिहाय विषयांचे सविस्तर वाचन करण्यात येवुन उपस्थित सभासदांनी एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली.
चेअरमन जयप्रकाश कोठावदे यांनी सभासदांशी हितगुज साधतांना देमको बँकेने सभासदांच्या हितासाठी देमको चॅरिटेबल ट्रस्ट सुरू करणे कामी सभासदांनी मंजुरी दिल्याने आभार व्यक्त केले. सभासद राजेंद्र देवरे यांनी देमको बँकेेने आर्थिक प्रगती साधली असतांना सभासद व शहरवासियांच्या आरोग्य सेवेसाठी देमको चॅरीटेबल ट्रस्ट निर्माण करण्याची सुचना केली.
ऑनलाईन सभेला सभासद सर्वश्री पियूष राणे ,केदा सूर्यवंशी ,प्रदीप आहेर, काशिनाथ अहिरे,हेमंत खरोटे ,राजेंद्र देवरे ,नितीन मेतकर ,विजय पगार,पुंडलिक आहेर,राजेंद्र अहिरराव , कौतिक पवार,अनिल पगार,सुनील दशपुते, दीपक दशपुते ,योगेश वाघमारे आदींनी उपस्थिती दर्शवली . प्रस्तावित व्यवस्थापक गणेश ततार यांनी केले तर आभार संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम