देवळा मर्चंट बँकेच्या वतीने सभासदांना पंधरा टक्के लाभांश – कोठावदे

0
44

सोमनाथ जगताप

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने लाभांश वाटपाची परवानगी दिली असून, सभासदांना बँकेच्या वतीने १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याची माहिती चेअरमन जयप्रकाश कोठावदे ,व्यवस्थापक गणेश ततार व संचालक मंडळाने दिली .

देमकोची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.दुष्काळी परिस्थिती व कोरोनाच्या परिस्थितीत बँकेला अहवाल काळात १ कोटी२६ लाख ३४ हजार ७०० रुपये निव्वळ नफा झाला आहे.

सण २०२०/२१ या आर्थिक वर्षात बँकेचे भागभांडवल ३ कोटी २० लाख १९ हजार ८०० रुपये तर ठेवी ९४ कोटी ४२ लाख ३८ हजार ७७२ रुपये , विविध बँकेत तसेच सरकारी रोख्यात ५७ कोटी ३५ लाख ५ हजार ६४३ रुपयांची बँकेने गुंतवणूक केली आहे. बँकेने सभासद व इतर ग्राहकांना कॅश क्रेडिट ,सोनेतारण ,वाहन तसेच व्यवसाय अशा प्रकारे एकूण ६० कोटी २१ लाख १५हजार ७८७ रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

मधल्या काळात रिझर्व्ह बँकेच्या निर्देशा नुसार सभासदांना लाभांश वाटप करता आले नाही. मात्र यावर्षीच्या वार्षिक अहवाल काळात अध्यक्ष जयप्रकाश कोठावदे व संचालक मंडळाने रिझर्व्ह बँकेकडे योग्य तो पाठपुरावा केल्याने सभासदांना लाभांश वाटपाची परवानगी देण्यात आली. यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

सभासदांनी याचा लाभ घेण्यासाठी केवायसी , बदललेला पत्ता, वारस नोंद आदी बाबींची पूर्तता करून घ्यावी ,असे आवाहन शेवटी अध्यक्ष जयप्रकाश कोठावदे ,व्यवस्थापक गणेश ततार व संचालक मंडळाने केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here