‘देवळा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर’ रिझर्व्ह बँकेची कारवाई

0
47

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; RBI ने राज्यातील अनेक बँकांवर कारवाईचा बडगा उगरलेला असून , त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील ‘देवळा मर्चंट बँकेला देखील बसला आहे’ यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बँकेची अनियमितता असल्याने ही कारवाई झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

देवळा मर्चंट बँकेचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले असून, या कारवाई मुळे खातेदारांना मात्र नाहक मनस्ताप होणार आहे. दंडाची रक्कम जरी छोटी असली तरी भविष्यात बँकेकडे बघण्याची खातेदारांची मानसिकता बदलली जाऊ शकते. यामुळे बँकेने भविष्यात काळजी घेणे गरजेचे आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रिझर्व्ह बँकेने नाशिक येथील ‘देवळा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर’ दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ तसेच नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकेला 25  हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून. यामुळे खातेदारांची चिंता वाढली आहे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here