देवळा बाजार समिती संचालकांचा ‘बाजार’ उठणार ; गाळे हस्तांतरण संदर्भात पणनचे फेरचौकशीचे आदेश

0
86

देवळा प्रतिनिधी : देवळा कृ.उ. बा. समितीतील गाळे हस्तांतरण प्रकरणातील, तक्रारदार  उदयकुमार आहेर यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर”
असून त्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हणत पणन संचालकांनी फेर चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे देवळा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

देवळा बाजार समितीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान उदयकुमार आहेर यांच्यामुळे टळले. असून या संदर्भात एकही संचालक बाजार समितीच्या भल्यावर नाही किंबहुना बैठकीत बोलत नाही. अशी परिस्थिती देवळा बाजार समितीची आहे. म्हणून निवडणुकीत मते न विकता वि.वि. कार्य. सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान करण्याचे उदयकुमार आहेर यांनी आवाहन केले.

देवळा समितीचा कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव केला अमान्य…

देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीतील बेकायदेशीररित्या हस्तांतरित झालेल्या गाळ्यांना कार्योत्तर मंजुरी देऊन नियमित करावे. असा प्रस्ताव बेकायदेशीररित्या देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक, श्री. सतिश खरे यांच्या सूचनेनुसार व चौकशी अधिकारी जिल्हा मुख्य लेखापाल वर्ग-1 डी. एन. काळे, यांच्या शिफारशीवरून राज्याचे पणन संचालक पुणे यांच्याकडे पाठविला होता. मात्र, याविषयी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर , यांनी पणन संचालकांची पुणे येथे भेट घेऊन संपूर्ण प्रकरणातील भ्रष्टाचार कसा झाला, व बाजार समितीचे कोट्यावधी रुपये बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ व सचिव यांनी कशा पद्धतीने हडप केलेले आहेत. हे निदर्शनास आणून दिले, त्यानुसार उदयकुमार आहेर यांच्या मुद्द्यांना तत्त्वतः मान्य करत सदर प्रकरणाचे फेर चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक यांनी जिल्हा उपनिबंधक नाशिक यांना दिलेले आहेत. उदयकुमार आहेर यांच्या तक्रारीवरून यापूर्वीच देवळा बाजार समितीत हडप झालेल्या रकमेतून 50 लाख रुपये भरणा करण्यात आला होता. त्यामुळे 50 लाख रुपये भरल्याचे दाखवून केलेला भ्रष्टाचार सहज पचेन असे दिवास्वप्न पाहणार्‍यांना ही सणसणीत चपराक मानली जात आहे. या संदर्भातील पत्र श्री. उदयकुमार आहेर यांना दि. 04/08/2021 रोजी उशिरा प्राप्त झाले.

सत्ताधारी विरोधी एका पंगतीला शेतकऱ्यांच्या भल्याचे बोलणार कोण ?
देवळा तालुक्यात सर्व राजकीय पक्ष एकाच दावणीला असल्याची परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी वर्गाची बाजू कोण घेणार ? हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. देवळा तालुक्यात हुकूमशाही आहे की लोकशाही हा संशोधनाचा विषय असून देवळा तालुक्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं गरजेची आहे. सर्व मोठे पक्ष व त्यांचे नेते आपल्या सोयीनुसार राजकारण करत आहे. मतदारांना गृहीत धरून बेभरवशाचे राजकारण सध्या सुरू असल्याची परिस्थिती आहे.

“माझी तमाम जनतेला व बाजार समितीच्या मतदारांना म्हणजेच गावोगावच्या सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायतीच्या संचालक सदस्यांना हात जोडून विनंती आहे की आपण बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करताना ज्या पद्धतीने पैसे घेऊन आपली मते विकतात त्यामुळे निवडून आलेले संचालक मंडळ सबंध तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असते किंबहुना त्यांना तसे रान मोकळे झालेले असते. तरी, कृपया बाजार समितीच्या निवडणुकीत तसेच अन्य कोणत्याही निवडणुकीत दारू, मटण व पैसे घेऊन आपली बहुमोल मते विकू नका ही. नम्र विनंती.”

-उदयकुमार निंबाजी आहेर देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here