देवळा प्रशासकीय इमारत स्वच्छतेला प्रहारचा ‘हात’

0
35
देवळा येथील प्रशासकीय इमारतीची स्वच्छता करताना प्रहारचे कृष्णा जाधव , तहसीलदार सूर्यवंशी ,नायब तहसीलदार विजय बनसोडे आदींसह कर्मचारी (छाया -सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; खर्डे रोडवरील प्रशासकीय इमारतीमध्ये शनिवार (दि 13) रोजी प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कॄष्णा जाधव यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . अनेक सरकारी कार्यालय घाण झालेले असतात, मात्र त्याची स्वच्छता नसते. हाच प्रकार देवळा तहसील कार्यालयात देखील घडला आहे.

देवळा येथील प्रशासकीय इमारतीची स्वच्छता करताना प्रहारचे कृष्णा जाधव तहसीलदार सूर्यवंशी नायब तहसीलदार विजय बनसोडे आदींसह कर्मचारी छाया सोमनाथ जगताप

सरकारी यंत्रणा स्वच्छतेत कमी पडत असतांना राजकीय संघटनांना हातात झाडू घेऊन साफसफाई करावी लागते हे जरी सकारात्मक असलं तरी, सरकारी यंत्रणेचे अपयश या ठिकाणी समोर आले आहे. सरकारी कार्यालय स्वच्छ नसतील ते राजकिय पुढाऱ्यांना करावे लागत असतील तर ही सरकारी यंत्रणेला चपराक आहे.

खर्डे – देवळा रोडवर शासनाने सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली असावीत या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारती उभारली असून, बहुतांश कार्यालये कार्यान्वित आहेत . यामुळे आपल्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची रेलचेल वाढली आहे . मात्र , या प्रशस्त इमारती मध्ये असलेल्या स्वच्छतागृहांबरोबरच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता , घाणीचे साम्राज्य पसरल्याने या इमारतीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

इमारतीच्या जिन्यात तसेच इतर काना कोपऱ्यात तंबाखू व गुटखा खाऊन येणाऱ्या अभ्यंगतांनी थुंकून संपूर्ण देखणी प्रशस्त इमारत खराब करून ठेवली आहे . याची खंत व्यक्त करून व सामाजिक बांधिलकी म्हणून खर्डे येथील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी शनिवारी( दि १३) रोजी स्वतःचा ट्रॅकर, ब्लोअर पिस्टन हातात घेऊन इमारत स्वच्छ केली.

या मोहिमेत तहसीलदार विजय सुर्यवंशी ,नायब तहसीलदार विजय बनसोडे ,कोतवाल ,शिपाई यांनी देखील सहभाग घेऊन इमारतीची स्वच्छता केली . जाधव यांच्या सहकार्याचे प्रशासने कौतुक केले असून, कामानिमित्त प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता राखावी व यापुढे तंबाखू ,गुटखा खाऊन इमारत व परिसरात थुंकून घाण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सूर्यवंशी यांनी दिली .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here