द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने (दि . २७) रोजी पोलीस शहीद दिन साजरा करण्यात आला . यानिमित्ताने नाशिक ग्रामिण पोलीस दलाकडील बॅण्ड पथकाने देवळा पाचंकदीलवर संचलन करून शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली .
देवळा तालुक्यातील शहीद पोलीस संजय दौलत भामरे( रा . वाखारी) , बाळू सुखदेव गांगुर्डे (रा.शेरी) ,भरतसिंग उमरावसिंग परदेशी (रा . लोहोणेर ) यांनी आपले शालेय शिक्षण ज्या शाळेत घेतले . त्या संबंधित शाळेत (दि . २१) रोजी शहीद दीन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून ( दि . २७) रोजी देवळा येथे नाशिक ग्रामिण पोलीस दलाकडील बॅण्ड पथकाने पाचंकदीलवर संचलन करून शहीदांच्या स्मृतीस अभिवादन केले .पोलीस निरीक्षक देविदास भोज आदींसह , पोहवा सोपान शिंदे ,पोलीस नाईक,दिलीप बोरसे ,चंद्रकांत निकम ,अरुण अहिरे , भास्कर सोनवणे ,निलेश सावकार , सचिन भामरे ,ज्योती गोसावी , रूचिका कुमावत , सारीका पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम