देवळा प्रतिनिधी : देवळा-मालेगाव रस्त्यावर मेशी व पिंपळगाव वाखारी शिवारात दोन वाहनांतून कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या २१ गोवंश जनावरांची देवळा पोलिसांनी मुक्तता केली आहे. सदर कारवाई शुक्रवारी (ता.२१) पहाटे पाच वाजता देवळा पोलिसांनी करून ८ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मेशी शिवार आणि पिंपळगाव वाखारी शिवारात दोन वाहनांमधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार देवळा पोलिसांनी वरील ठिकाणी पिकअपमधून (क्र. एमएच.२१, एक्स.४८४६) ११ गोवंश जनावरे आणि दुसऱ्या पिकअपमधून (क्र. एमएच.४१, जी.९३५१) १० गोवंश जनावरांची कत्तलीपासून सुटका केली. या प्रकरणी पोलीस हवालदार सुनील गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुरनं.३३/२०२२ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारणा) चे कलम ५ अ, ब, ८ ई, तसेच भारतीय प्राणी संरक्षण कायदा १९६० चे कलम ११ (१) (ड) (घ) प्रमाणे गुन्हा दाखल करून एकूण ८ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार शेख, सुनील पवार, निकम, पोलीस नाईक नीलेश सावकार, सचिन भामरे, किरण पवार, पोलीस शिपाई शिंदे यांनी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम