देवळा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
37

देवळा प्रतिनिधी : ४० वी राज्यस्तरीय सब ज्युनियर बाॅलबॅडमिटंन स्पर्धा वसमत (हिंगोली) येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत देवळा पब्लिक स्कुलचे खेळाडू उमेश सांगळे ,भावेश सुर्यवंशी यांची राजेम-श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश येथे जानेवारीत संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.

नाशिक ग्रामीण बाॅलबॅडमिटंन संघातील अष्टपैलू खेळाडू उमेश सांगळे याची मुंबई संघातून तर भावेश सूर्यवंशी याची महाराष्ट्र संघातून निवड समिती सदस्यांनी निवड केली. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना नाशिक ग्रामीण बाॅलबॅडमिटंन असोसिएशन अध्यक्ष संजय आहेर, सचिव तुषार देवरे व क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. देशपातळीवर निवड झालेल्या खेळाडूंचे जि. प.सदस्या डॉ नूतन आहेर, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, प्राचार्य के. डी. पाटील व सर्व शिक्षक तसेच माजी शिक्षक व माजी विद्यार्थी संघटना पदाधिकारी , नाशिक ग्रामीण बाॅलबॅडमिटंन संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here