देवळा नगर पंचायत रणधुमाळीतुन चार प्रभाग सायलेंट मोडवर

0
15

द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगर पंचायत निवडणुकीत एकूण चार वॉर्ड ओबीसी साठी राखीव असल्याने 4, 8, 10, 13 या वॉर्डातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

राज्य सरकारने ओबीसी आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न केले सर्व पक्षीय बैठका घेतल्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 50% चे मर्यादेच्या आत ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला राज्यपालांनी मान्यता ही दिली. त्यानंतरच ओबीसी आरक्षणासह निवडणुका लागल्या मात्र ओबीसी राखीव जागांचा पेच निर्माण होऊन त्या रद्द केल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के राजकीय आरक्षण दिले होते, त्या अध्यादेशाला सुप्रिम कोर्टाने काल स्थगिती दिल्याने देवळा नगरपंचायतीची
मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव झालेल्या ४ प्रभागातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

उर्वरित एकूण १३ प्रभागातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे. यामुळे रणधुमाळी ओबीसी वगळता इतर प्रभागात होणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here