देवळा नगर पंचायत ‘मागास प्रवर्गासाठी’ उद्या आरक्षण सोडत

0
84

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उद्या (दि १२ ).रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली .

जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या निफाड , पेठ , सुरगाणा , कळवण , देवळा व दिंडोरी या नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे . एप्रिल २०२० ते, मे २०२१ मध्ये मुदत संपलेल्या एकूण ०६ नगरपंचायतींमध्ये ना.मा.प्र .च्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० % च्या वर जात असल्यामुळे या नगरपंचायतींसाठी नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२१ अन्वये जाहीर झाला आहे .

शुक्रवारी दि १२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे .याकरिता उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे . देवळा नगरपंचायत करिता येवला येथील उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे . याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रक संबंधित मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.

हे ही वाचा…….

माथाडी कामगारांचा संप मिटला…

कांद्यांची मोठी उलाढाल होत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील बसवंत बाजार समितीमध्ये (Pimpalgaon Baswant APMC) गेल्या दोन दिवसांपासून माथाडी कामगारांनी संप पुकारल्यामुळे लिलाव ठप्प झाले होते. मात्र आता हा संप संपला असून कामगारांनी आपल्या मागण्या मागे घेतल्या आहेत. मात्र कामगारांनी आता संप मागे घेतला असला तरी त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा संप केला जाईल अशी माहिती कामगारांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मोठी उलाढाल होत असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून माथाडी कामगारांनी संप पुकारला होता. हा संप पुकारल्यामुळे लिलाव ठप्प झाले होते. आता हा संप मिटला असून उद्या सकाळी नऊ वाजेपासून लिलाव पूर्ववत होतील अशी माहिती पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here