द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि १२) रोजी देवळा नगरपंचायत कार्यालयात सतरा जागांसाठी येवल्याचे उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी महिलांसाठी एकूण नऊ जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यासाठी प्रत्येकी एक तर इतर मागास वर्गासाठी दोन, व सर्वसाधारण जागेसाठी पाच जागा आरक्षित करण्यात आल्या . उर्वरित जागा याप्रमाणे अनुसूचित जाती व जमाती साठी प्रत्येकी एक तर इतर मागासवर्गाच्या जागांसाठी दोन, व सर्वसाधारण साठी चार जागा आरक्षित झाल्या. यावेळी फैजान पठाण मुलाच्या हस्ते सोडत काढण्यात आली . प्रभाग नुसार आरक्षण याप्रमाणे प्रभाग क्रमांक -१- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक २- अनुसूचित जमाती , प्रभाग क्रमांक ३ -अनुसुचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक ४- इतर मागास वर्ग महिला, प्रभाग क्रमांक ५- सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ६- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ७ – अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक ८- इतर मागास वर्ग महिला, प्रभाग क्रमांक ९- अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक १०- इतर मागास वर्ग , प्रभाग क्रमांक ११- सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक १२- सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक १३- इतर मागास वर्ग , प्रभाग क्रमांक १४- सर्वसाधारण – प्रभाग क्रमांक १५- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १६- सर्वसाधारण, – प्रभाग क्रमांक १७- सर्वसाधारण, याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विजय बनसोडे, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोळे आदींनी कामकाज पाहिले .सोडत प्रसंगी राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचा हे पण….
२७ वर्षानंतर भरली शाळा…११ वी-१२ वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
देवळा : येथील ११ वी व १२ वीच्या सन १९९२-९४ मधील बॅचच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिवाळीच्या सुटीत मोठया उत्साहात साजरा झाला. तब्बल २७ वर्षानंतर मित्र व शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. व्यवसाय, नोकरी, कामानिमित्त दुरावलेले मित्र यानिमित्त एकत्र आले.
मैत्रीच्या खऱ्या खुऱ्या भावनांना पुनर्जीवित केले. पुन्हा एकदा शाळेतील मित्रांच्या भेटीमुळे उत्साहवर्धक ऊर्जा प्राप्त झाली. यावेळी उपस्थित पी.के.चंदन, पी.बी.देवरे, एम.डी.खैरणार, व्ही.पी.केदारे या गुरुजनांचा सर्वच विद्यार्थ्यांनी सन्मान करत भेटवस्तू दिल्या. आणि तद्नंतर या माजी विद्यार्थ्यांनी व गुरुजनांनी मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.एकमेकांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असा संदेश दिला.
कोरोना काळात माजी सैनिक जिभाऊ खैरणार यांनी यातील एका मित्राला मुंबईहुन रेमडिसिव्हर इंजेक्शन पोहोच केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सटाणा येथील कवी सोमदत्त मुंजवाडकर यांनी चारोळ्या, कविता सादर करत रंगत आणली. या स्नेहमेळाव्याचे संयोजन प्रशांत पवार, जिभाऊ खैरणार, दादाजी देवरे, किशोर पाटील, अण्णा पवार, शरद गांगुर्डे, उमेश ठाकरे, भाऊसाहेब महाजन, नंदू पवार, पोपट आहिरे, दीपक सोनवणे, रोशन अलीटकर, माणिक बागुल, हेमंत आहेर, दादाजी भामरे यांनी केले. सुत्रसंचालन दादाजी देवरे यांनी केले आभार प्रशांत पवार यांनीमानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम